Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते 19 कोटी 60 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन; मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी लवकरच मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटणार आ. राणाजगजितसिंह पाटील

काटी/उमाजी गायकवाड
आगामी होऊ घातलेल्या  लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटी -सावरगाव जिल्हा परिषद गटातील तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 9 रोजी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 19 कोटी 60 लाखांच्या विविध विकासकामांचे उद्धघाटन व भुमिपूजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने सांगवी (मार्डी) ते सावंतवाडी या 21 किलोमीटरच्या 15 कोटींच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,काटी ते खुंटेवाडी-धामणगाव या रस्त्याचे 60 लाखांचे डांबरीकरण, काटी ते जवळगाव 1 कोटीचे डांबरीकरण, काटी ते वाणेवाडी-दारफळ रस्त्याचे 40 लाखांचे डांबरीकरण, काटी येथील घणकचरा व सांडपाणी व्यवस्थापन 50 लाख, जयसिंग सावंत ते शाम चव्हाण अंतर्गत सिमेंट रस्ता 10 लाख, मुरलीधर घाणे ते अशोक हेडे  अंतर्गत सिमेंट रस्ता 10 लाख, इंदिरा नगर मधील खंडोबा मंदिर सभामंडप 10 लाख, उदनशाह दर्गा सभामंडप 10 लाख, शादीखाना बांधकाम 20 लाख, खंडोबा मंदिर ते जिल्हा परिषद शाळा सिमेंट रस्ता 15 लाख दलित वस्ती सिमेंट रस्ता 10 लाख, दादा बेग ते शहाबुद्दीन शेख घर सिमेंट रस्ता 10 लाख, युसुफ शेख ते सुभाष पंखे घर 10 लाख, अशोक हेडे ते विठ्ठल ढगे घर सिमेंट रस्ता 10 लाख, मदीना मज्जीद ते महिबुब बेग घर सिमेंट रस्ता 10 लाख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते बापू काळे घर सिमेंट रस्ता 10 लाख, भागवत गुंड ते पोपट गाटे घर 10 लाख, दिलीप डोलारे ते सुभाष पारडे घर सिमेंट रस्ता 10 लाख, अशोक क्षीरसागर ते श्रीरंग कांबळे घर सिमेंट रस्ता 10 लाख, भैरवनाथ मंदिर ते अर्जुन बामणकर सिमेंट रस्ता 10 लाख, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती 10 लाख, भिमनगरमध्ये सिमेंट रस्ता 10 लाख, माळी गल्लीत सभामंडप 15 लाख ही कामे मंजूर झाली असून यातील काही कामांचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घघाटन व भुमिपूजन करण्यात आले.

त्यानंतर येथील मुख्य बाजार चौकात जाहीर सभा घेण्यात  आली. प्रारंभी भाजपचे विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांनी ग्रामस्थांच्या वतीने विविध विकासकामे मंजूर केल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रमसिंह देशमुख यांनी ग्रामस्थांच्या वतीने काटीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली.

  आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 

या सभेत उपस्थित नागरिकांना उद्देशून बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विविध विकास कामांविषयी माहिती देऊन म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने पाण्यावरच येथील गणिते अवलंबून आहेत. भाजप सरकारच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने  कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे जलसंपदा विभागामार्फत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरु असलेले काम  युद्ध पातळीवर सुरु असून तहानलेल्या मराठवाड्याला लवकरच उजनी धरणातून सीना-कोळेगाव प्रकल्पातून  येणारे पाणी मिळणार असून हे पाणी तुळजापूरच्या खाली रामदरा तलावात सोडले जाणार आहे. त्यामुळे या कॅनेलद्वारे काटी, पांगरदरवाडी,दहिवडी, सावरगाव या भागातील चार ते पाच साठवण तलावात पाणी सोडले जाणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा दुष्काळ दूर होऊन हा भाग सुजलाम-सुफलाम होणार आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर- सांगली महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना राबविण्यात  येणार असल्याने बऱ्याच अंशी मराठावाड्‌यातील  पाणी प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या वतीने लखपती निधी योजना सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सर्व  नागरिकांचा विश्वास संपादन करीत केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण योजना,  पंतप्रधान आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम किसान सन्मान योजना,सुकन्या समृद्धि योजना,बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना यांसारख्या विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार 

या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शुभांगी नाबाजी ढगे काटी यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, ब्रम्हदेव महादेव फंड जळकोटवाडी यांना युवा शेतकरी पुरस्कार व गंजेवाडीतील सुदर्शन जाधव यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

दहिवडीतील दोघांचा भाजपमध्ये प्रवेश
दहिवडी येथील शाम अंधारे व संजय गाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भारतीय जनता माथाडी पार्टी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे, वाणेवाडीचे सरपंच महादेव जाधव, विजय निंबाळकर, अनिल गुंड,दादा बेग,मकरंद देशमुख, अतुल सराफ,हेरार काझी,बाळासाहेब भाले,संपत पंखे,राजु ढगे, चेअरमन संजय साळुंके,संजय महापूरे,अनिल ढगे,ज्ञानेश्वर गुरव, गोकुळ सोनवणे, मंजुर कुरेशी, बाळासाहेब शिंदे, धनाजी ढगे, हणमंत ढगे, माजी सरपंच प्रताप ढगे, रोहित  पाटील, रंगनाथ डोलारे,भागवत गुंड,त्रिगुणशिल साळुंके,मनोज हंगरकर,अप्पा कुरेशी, सिकंदर कुरेशी,रफिक कुरेशी,अहमद पठाण,अमर देशमुख, अविनाश देशमुख, तानाजी सावंत, श्रीकांत गाटे,शंकर कदम, बालाजी शिंदे,अमोल माने, नरसिंग धावणे, दयानंद चुंगे, वाणेवाडीचे माजी सरपंच खेलबा क्षिरसागर, कुमार सावंत,प्रशांत सावंत,बळीराम साळुंके,महादेव सावंत,समाधान सावंत,हरी सावंत, लिंबराज शिनगारे,बंटु लोके, लक्ष्मण महिमकर,अर्जुन राठोड,हरिभाऊ जाधव, काकासाहेब जाधव,दत्तात्रय जाधव,सत्यवान कदम,कैलास जाधव,नजीब काझी,प्रशांत गाटे,संजय आदलिंगे, सचिन गाटे, ज्ञानेश्वर सिरसट,विठ्ठल गायकवाड आदींसह भाजप कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments