काटी/उमाजी गायकवाड
धाराशिव -(उस्मानाबाद) लोकसभा क्षेत्रातील रामभक्तांना अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष सवलतीत जाण्यासाठी धाराशिव रेल्वेस्थानकातून ‘आस्था एक्स्प्रेस’ मंगळवार दि.5 रोजी सायंकाळी 6:10 वाजता रवाना झाली.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडल्यानंतर आता अयोध्या येथे मंदिरात जाऊन ‘याचि देही याचि डोळा’ श्री रामलल्लाचे दर्शन घेता यावे, ही इच्छा प्रत्येक रामभक्तांची आहे. लाखो हिंदूजनांची ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘आस्था’ ही विशेष रेल्वेगाडी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी सोडण्यात आली असून मंगळवारी धाराशिव लोकसभा क्षेत्रातील तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून "आस्था एक्स्प्रेस" अयोध्येकडे रवाना झाली. यावेळी हजारो भाविक रवाना झाले आहेत.
याच रेल्वेने रामलल्लाच्या दर्शनासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी,सावरगाव, केमवाडी , वडगाव (काटी) रामभक्त धाराशिवहून आस्था एक्स्प्रेस रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले. जय श्रीरामच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी धाराशिवहून अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी रेल्वेने मोठ्या थाटा-माटात रवाना झाली.
अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारल्यानंतर दर्शनासाठी देशभरातून रामभक्त जात आहेत. त्याअनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील काटी,सावरगाव, केमवाडी ,वडगाव (काटी) येथील काटीचे माजी सरपंच आदेश कोळी, सावरगाव येथील सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नेताजी कदम, काटीतील हभप सुनिल ढगे महाराज, सुनिल परिट, महेश पांगे, ज्ञानेश्वर लाडुळकर, युवराज सातपुते,योगेश धावणे, शहाजी सातपुते, बापू वाडकर आदी रामभक्त रेल्वेने अयोध्येत रामल्लाच्या दर्शनासाठी विशेष सवलत व उत्तम सोयीसुविधांसह सुरक्षित प्रवासासह या विशेष गाडीने मंगळवारी सायंकाळी अयोध्येकडे रवाना झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments