काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील बोधगिरी भजनी मंडळाचा उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय भजन गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे मंगेश साठे यांच्या वाढदिवसानिमित्त हा राज्य स्तरीय भजन गायन स्पर्धेचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता.
या स्पर्धत तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील बोधगिरी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथील
विजय भजनी मंडळाने पटकावला तर तृतीय क्रमांक पंढरपूर तालुक्यातील येवती येथील जीवन स्वप्न साक्षी भजनी मंडळाला मिळाला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस उत्तर सोलापूर तालुक्यातील दारफळ (गावडी) येथील संत सेवा भजनी मंडळास मिळाले. तसेच वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट पखवाज वादक प्रवीण कुलकर्णी, तबलावादक, विजय कांबळे, उत्कृष्ट गायक समाधान निचळ, हार्मोनियम वादक पुण्यवंत वाघमारे,टाळ वादक कु.शहापूरकर गुरुभक्ती मंडळ पंढरपूर. उत्तेजनार्थ ठरलेल्या सर्व स्पर्धकास रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम (काका ) साठे हभप भागवताचार्य गणेश महाराज वारंगे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.परीक्षक म्हणून शंकर माने, कैलास जाधव अनिल कुलकर्णी, विश्वजीत माने होते.
यावेळी सुरेश साठे लोकमंगल नागरी पतसंस्थाचे अध्यक्ष , प्रल्हाद काशीद तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,उत्तर सोलापूर, डॉ.वैशालीताई साठे सिनेट सदस्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, उपसरपंच अनिल माळी,डॉ. ज्ञानेश्वर सिरसट डॉ.प्रवीण भाले ,मंगेश साठे,यशवंत गायकवाड, बाळासाहेब सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत शिंदे यांना देताना बळीराम साठे ह भ प गणेश वारंगे महाराज, सुरेश साठे, वैशाली साठे, प्रल्हाद काशीद आदी मान्यवर..
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments