काटी/उमाजी गायकवाड
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता,भौतिक सुविधांसाठी राबविलेले उपक्रम, सीएसआर अंतर्गत मिळवलेल्या देणग्या, शिक्षकांनी नावीन्यपूर्ण तयार केलेले उपक्रम,आरोग्य, परसबाग,शासनाच्या योजना प्रभावीपणे किती प्रमाणात राबविण्यात आल्या अशा निकषानुसार प्रत्यक्षात शाळा तपासणी पथकाकडून प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील नांदुरी केंद्रातील यमगरवाडी -मंगरुळ येथील एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळा या शाळेला तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यात यश प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी एकलव्य प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, एकलव्य माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,खंडू काळे, कोंडीबा देवकर, मयूर अंतरेड्डी, ज्ञानेश्वर भुतेकर,यशवंत निंबाळकर, फुलाजी ताटी, कुंडलवार, सुजाता गणवीर, संगीता पाचंगे, सोनिया अंतरेड्डी, दत्ता भोजने,भीम कुंभार, शालिवाहन वाघमोडे,रमाकांत पवार, बालाजी क्षीरसागर, संतोष बनसोडे,निर्मला हुगे,अण्णासाहेब मगर, महादेव शेंडगे,अशोक बनकर, अनिल घुगे, हरिष मगदूम,दयानंद भडांगे,प्रणिता शेटकार,सविता गोरे,किरण चव्हाण,लता हेरुर,लक्ष्मी पवार, ताई जाधव, सुनीता जाधव, शकुंतला भोजने, जयश्री वाघमोडे, बालाजी भांडेकर आदींनी परिश्रम घेतले.
एकलव्य विद्या संकुलात हे अभियान राबविण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान कडून अनिल घुगे व संतोष बनसोडे यांचेकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली होती.
एकलव्य विद्या संकुलाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष रामचंद्र वैदू , उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव विवेक अयाचित,गिरीश कुलकर्णी,अभय कुलकर्णी, सतीश कोळगे,अशोक संकलेच्या,नरेश पोटे, नाना शिर्के मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments