मुरुम/प्रतिनिधी
मुरूम येथील रोटरी क्लब मुरूम सिटी व ग्रामीण रुग्णालय मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.
3 रोजी ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत बालकांना पोलिओ मात्रा पाजविण्यात आली.
आपला भारत पोलिओ मुक्त झाला असला तरी आपल्या शेजारील देशात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने भारतात पुन्हा एकदा खबरदारीचा उपाय म्हणून सदर अभियान राबविण्यात येत आहे. याप्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सत्यजित डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी सोनवणे, डॉ. जी. एल. कांबळे, सपोनि पवनकुमार इंगळे, डॉ. नितीन डागा, डॉ राजेंद्र पाटील, डॉ. महेश स्वामी, डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी, प्रकाश रोडगे, गोविंद पाटील, कल्लय्या स्वामी, संतोष कांबळे, भूषण पाताळे, डॉ. बळवंत चव्हाण, डॉ. महेश मोटे, डॉ. विजयानंद बिराजदार, उल्हास घुरघुरे, शरणाप्पा धुम्मा, शिवकुमार स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुरूम, ता. उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांना पोलिओची मात्रा पाजताना डॉ. सत्यजित डुकरे, पवनकुमार इंगळे, कमलाकर मोटे, सुनिल राठोड, नितीन डागा, कल्लय्या स्वामी, संतोष कांबळे, प्रकाश रोडगे व अन्य.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments