काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरुळ येथील एकलव्य विद्या संकूलात प्रशालेच्या वतीने शनिवार दि. 2 रोजी सकाळी दहावीच्या 40 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. भटके -विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंगरुळ येथील इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुदर्शन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त करून शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलच्या तीन मोठ्या टाक्या भेट दिल्या. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
इयत्ता दहावीतील विद्यार्थींनी साक्षी गायकवाड हिने निरोप समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या माझ्या शिक्षणात या शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले. त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही. शाळेचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी निश्चित मेहनत घेऊ अशी ग्वाही यावेळी तिने दिली. श्रीमती सुजाता गणवीर हिने स्वरचित विद्यार्थ्यांवरील गीत सादर केले.
प्रमुख पाहुणे सुदर्शन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी एकलव्य विद्या संकूलात मिळालेली गुणात्मकता, संस्कार,बौद्धिक ज्ञानाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी महत्त्व द्यायला हवे त्याच प्रमाणे पुढील काळात यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देता तितकेच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. एकलव्य विद्या संकूल या शाळेने तुम्हाला जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. ती शिदोरीचा तुम्ही उपयोग करून जीवनात यश प्राप्त केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वत:चे तसेच शाळेचे नाव व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, व शाळेने दिलेले चांगले गुण आचरणात आणावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकलव्य विद्या संकूलातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.
यावेळी शहापूरकर व शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेखणी भेट देण्यात आली. त्याप्रसंगी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
या वेळी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित,मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, प्रमुख पाहुणे सुदर्शन शिंदे, विठ्ठल म्हेत्रे, बालाजी क्षीरसागर,संतोष बनसोडे,अनिल घुगे,भीम कुंभार,अण्णासाहेब मगर,महादेव शेंडगे अशोक बनकर, गोविंद सोमानी, लातूरचे प्राध्यापक तांबळकर, दयानंद भडांगे,सौ.सोमानी, श्रीमती सुजाता गणवीर, निर्मला हुग्गे,दत्ता भोजने,यशवंत निंबाळकर, कोंडीबा देवकर,खंडू काळे, कर्न धनके आदींसह शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments