काटी/उमाजी गायकवाड
पोलिओ आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी राबविण्यात आलेल्या तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे रविवार दि.3 रोजी येथील आरोग्य उपकेंद्रातील पल्स पोलिओ लसीरकण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेचा शुभारंभ सरपंच सौ.सुलेखा सुतार ,समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती स्वाती बारस्कर व तालुका पर्यवेक्षक महेश पाठक यांनी बालकांना डोज पाजून करण्यात आला.
यावर्षी ही मोहीम दोन टप्प्यात राबविली जात आहे. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस पाजण्यात येत आहे. यासोबतच या मोहिमेतून सुटलेल्या बालकांना देखील विशेष लसीकरण मोहीम राबवून लस पाजण्यात येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 149 लाभार्थ्यांपैकी 120 बालकांचे लसीकरण झाले असून आणखी 10 ते 15 बालकांचे लसीकरण होईल व उर्वरित बालकांना विशेष लसीकरण मोहीम राबवून लसीकरण केले जाणार आहे.
यावेळी सरपंच सौ.सुरेखा सुतार, तालुका पर्यवेक्षक श्री महेश पाठक,समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती स्वाती बारस्कर,आरोग्य सेविका श्रीमती ज्योती गवले,आशाताई श्रीमती अनिता भोसले,श्रीमती छाया सुतार,श्रीमती शामल वडणे, श्रीमती रोहिणी तुळश, श्रीमती अलका सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments