Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे सुवर्ण महोत्सवी तुकाराम बीज उत्साहात साजरी

    जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी मिरवणूक 

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सुवर्णमहोत्सवी तुकाराम बीज आध्यात्मिक परंपरा जपत येथील गुंड परिवार व नागनाथ पांडुरंग मदने यांच्या घरी बुधवारी तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. 

यानिमित्त सकाळपासूनच काकड आरती, महिलांचा भारुड कार्यक्रम, किर्तन सोहळा, तुकाराम  महाराज दिंडी पालखी मिरवणूक तुकाराम गाथा पारायण असे विविध कार्यक्रम पार पडले. दुपारी 12 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्यावर नागनाथ  मदने यांच्या घरी ह.भ.प सुनिल महाराज ढगे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. तर गुंड परिवाराच्या वतीने केशगावच्या महिला शशिकलाताई कोळगे व पुळूजचे तानाजी मदने यांचा भारुडाचा  कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी 12 वाजता गुलालाची उधळण करण्यात आली.या तुकाराम बीज उत्सवास गावातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यानिमित्त दुपारी 12 वाजता तुकाराम महाराज बीज उत्सवानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. गावातील विविध राजकीय,सामाजिक, व भाविकांनी या उत्सवास भेट देऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. हा सुवर्णमहोत्सवी तुकाराम बीज उत्सव यशस्वी करण्यासाठी अनिल गुंड, सुनील गुंड, संतोष गुंड,जितेंद्र गुंड, दत्तात्रय गुंड,काकासाहेब गुंड, आप्पासाहेब गुंड,बाबासाहेब रोडे, काकासाहेब रोडे, भालचंद्र मासाळ, गणपती शिवाजी शिवरे, हभप सुनील महाराज ढगे, विठ्ठल सुतार, मनोहर कदम, रामचंद्र घडामोडे, भागवत गुंड, पवन गाटे, मोहन कादे,अनंतराव चिवरे, संताजी भापकर, आप्पासाहेब गाटे,सुरज गाटे, अमोल शितोळे आदींसह काटीतील गाटे गल्ली भजनी मंडळ,माळी गल्ली भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ,तरुणवर्ग, गुंड  परिवार, मदने परिवार यांनी परिश्रम घेतले. 

सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत गावातील प्रमुख मार्गावरून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी दिंडी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता करण्यात  आली.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments