उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र संशोधन केंद्र व पदवी-पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती करण्याच्या हेतूने मंगळवार (ता. २) रोजी आग्रहाचे निमंत्रण या पत्रकाचे उद्घाटन उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शौकत पटेल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे अध्यक्षस्थानी होते.या प्रसंगी प्रा.दत्ताभाऊ सुर्यवंशी, डॉ.वसंत गायकवाड, डॉ.एस.टी.तोडकर,डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ.विलास खडके, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, दत्ता बोडरे, राजू ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. शौकत पटेल म्हणाले की, भारतीय संविधानाने १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकांना मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. हा हक्क बजावत असताना कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता हा हक्क बजावला पाहिजे. एका मताचे मूल्य भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचे असते. मतदान प्रक्रियेतून कोणीही वंचित राहणार नाही याची तरुणांनी काळजी घेतली पाहिजे. हा राष्ट्रीय हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच असल्याचे शेवटी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रविंद्र आळंगे तर आभार डॉ. शिवपुत्र कनाडे यांनी मानले. यावेळी पालक, महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आग्रहाचे निमंत्रण या पत्रकाचे उद्घाटन करताना उपप्राचार्य विलास इंगळे, डॉ. शौकत पटेल, डॉ. अशोक सपाटे, प्रा. दत्ता सुर्यवंशी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. महेश मोटे आदिंनीसह विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य.
0 Comments