काटी/उमाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल सोमवार दि.27 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. या परिक्षेत काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेतील सहशिक्षक तानाजी शेळके यांची कन्या तर सेवा निवृत्त शिक्षक संदीपान साळुंके यांची नात तथा मॉडेल पब्लिक स्कूल, सोलापूरची विद्यार्थीनी कु. आम्रपाली तानाजी शेळके हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर 94.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
कोरोना काळात तिच्या आईचे निधन झाले होते. परंतु वडिल तानाजी शेळके यांनी आईची उणीव न भासू देता दुहेरी भूमिका बजावत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेत आहेत. कु.आम्रपाली हिचा थोरला बंधू तेजस हा वैद्यकीय शिक्षण घेत असून तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कु. आम्रपाली ही पण डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. कु. आम्रपालीने सर्व विषयात कौतुकास्पद गुण प्राप्त केले आहेत.
कु. आम्रपाली शेळकेनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments