काटी/उमाजी गायकवाड
1991 साली केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात भरती झालेल्या व गेली 34 वर्ष केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात सेवेत कार्यरत असलेले तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथील शेतकरी कुटुंबातील दिनकर बळीराम शिंदे यांनी पोलीस दलातील खडतर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवासात सेवा बजावत व सेवा कार्यकाळात उत्कृष्ट सेवा बजावत कॉन्स्टेबल, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली.
मुळच्या तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) या एका छोट्याशा खेडेगावात राहणारे शेतकरी कुटुंबातील दिनकर बळीराम शिंदे यांनी जम्मू काश्मीर, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, गडचिरोली छत्तीसगड अशा ठिकाणी उग्रवादी व नक्षलवादी प्रदेशात राहुन अतिशय खडतर प्रवास करून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात सेवा बजावत कॉन्स्टेबल पदावरुन हवालदार पदावर व हवालदार पदावरुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन उपनिरीक्षक पदावर दिल्ली येथे रुजू झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल मसला (खुर्द) सह सर्वत्र कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments