काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे येथील भिमनगरमधील बुध्द विहारात गुरुवार दि. 23 रोजी तत्त्ववेत्ता , आध्यात्मिक मार्गदर्शक, एकनिष्ठ ध्यानकर्ते शांतीदूत तथागत भगवान बुद्ध यांची 2568 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी तन्वी दत्ता बनसोडे, बाळासाहेब क्षिरसागर व भिमा घोंगडे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात दलित मित्र नंदू बनसोडे यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत म्हणाले की, प्रत्येक जण हा स्वत:चा मार्गदाता असतो. सदाचाराचे आयुष्य जगायचे की दुराचाराचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते, हा मूलमंत्र देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करीत असताना भगवान गौतम बुद्धांनी मानवता शिकवली, शांततेचा मार्ग दाखवला आणि या मार्गाची सध्या सर्वांना गरज असून तरुणांनी गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन करुन स्वलिखित व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा,व शिक्षण यावर मार्गदर्शनपर पुस्तके भेट दिली. यावेळी किरण नंदू बनसोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, भोलेनाथ बनसोडे, किरण बनसोडे, बाळासाहेब क्षिरसागर, जितेंद्र बनसोडे, ताई सुरते, भिमा घोंगडे, सागर कांबळे,शहाजी बनसोडे,नागनाथ चंदनशिवे, तेजस बनसोडे,रवी डोळसे,शशी बनसोडे,तन्वी बनसोडे,रंजना शेरखाने, सोजरबाई बनसोडे, उंबराबाई साबळे,अनुसया बनसोडे,तारामती जाधव,शोभा चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड,काटी
9923005236
0 Comments