Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सारोळा येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी

धाराशिव:- धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बौद्ध अनुयायी अण्णा मुरलीधर कठारे यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. 

सारोळा येथे श्री कठारे यांच्या निवासस्थानी भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांच्या पुतळा व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रणदिवे, माजी सरपंच प्रशांत रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता वाघमारे, सोमनाथ कठारे, मुरलीधर कठारे, अण्णा कठारे, नितीन कठारे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने सारोळा गावचे सुपुत्र दत्तात्रेय वाघमारे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल श्री रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दत्तात्रय वाघमारे यांच्या पदोन्नती निमित सत्कार करताना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय भैय्या रणदिवे व उपस्थित मान्यवर...

Post a Comment

0 Comments