Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

तुळजापूर/प्रतिनिधी 
तुळजापूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शुक्रवार दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

 हा कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अध्यापक आर.एम. अलसेट व क्रीडा अध्यापिका एस .आर.अलसेट यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवीत वेगवेगळ्या योगासनांच्या कृती करताना कशा पद्धतीने केल्यास त्याचे फायदे व विपरीत केल्यास त्याचा शरीरावर कोणता अनिष्ट परिणाम होतो हे प्रात्यक्षिके करत असताना सविस्तर माहिती सांगितली. 

याप्रसंगी ताडासन ,पद्मासन, धनुरासन ,अर्धचंद्रासन, भुजंगासन ,गरुडासन ,पद्मासन, दंडासन, प्राणायाम ही वेगवेगळी प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखवली.  धाराशिव जिल्ह्यातील नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दृकश्राव्य प्रणाली द्वारे प्रात्यक्षिके दाखवण्यात आला  आली. यामध्ये अनेक  विद्यार्थी, पालक, शिक्षक या दृकश्राव्य प्रणालीमध्ये प्रात्यक्षिके ही करून दाखवून सहभाग नोंदविला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.गंगाराम सिंह शेवटी म्हणाले की, योगासनामुळे आपले शरीर सदृढ बनण्यास मदत होते ,शरीरातील ऊर्जा वाहिन्या सक्रिय होतात.  आयुष्यमान वाढते .त्यासाठी आरोग्य निरोगी राहण्यासाठी सर्वांनी दररोज कमीत कमी अर्धा तास तरी योगासने करण्याचे आवाहन करून सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी दृकश्राव्य प्रणालीमध्ये  विद्यार्थी व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  सहभागी झाले होते. याप्रसंगी विद्यालयातील हरी जाधव, सुजाता कराड, रवींद्र अलसेट ,सुनेत्रा अलसेट,डॉ. रामेश्वर यादव, संस्कार यादव, संजय गायकवाड, शशिकांत माने ही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments