Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी  गायकवाड
प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा लाभलेल्या व योगा विद्येची जगाला ओळख  करून देणाऱ्या भारताला योगा हे एक मोठे वरदान आहे.

शुक्रवार दि. 21 रोजी जागतिक  योग दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी  जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेसमोरील  प्रांगणात घेण्यात आलेल्या योगा प्रात्यक्षिकात क्रीडा  शिक्षक दिगंबर कदम यांनी विद्यार्थ्यांकडून दीर्घ श्वसन, सुर्य नमस्कार, प्राणायामची प्रात्यक्षिके करून घेतली. या योगा प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांसह  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी मानवी आरोग्य व व्यायामाचे महत्त्व, पूरक आहार व सुदृढ जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून नियमित योगा करण्याचे आवाहन  केले.
 
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक  किशोर बनसोडे, क्रीडाशिक्षक दिगंबर कदम, सहशिक्षक सुनील  खेदाड,उमाकांत कदम,गणेश गुंगे, लिपिक गणेश ढास,श्रीमती नंदाश्री चंदनशिवे आदी मान्यवर 
उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments