Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माधवराव पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा

मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी (ता. २१) रोजी योगा व प्राणायाम करून साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी कर्मचारी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार व योग शिक्षक प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. शारीरिक,बौद्धिक व मानसिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे दाखवत आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणून योगा स्वीकारला पाहिजे. हा संदेश देत यावेळी मुलांना १२ पेक्षा जास्त आसने करून दाखवली.

यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.संध्या डांगे, प्रा.दयानंद बिराजदार, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. सुशिल मठपती आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. रमेश आडे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुजित मटकरी, प्रा.अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेऊन योग दिन उत्साहात साजरा केला.    

मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा करताना डॉ. चंद्रकांत बिराजदार प्रात्यक्षिकासह योगा करताना..

Post a Comment

0 Comments