Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीतील शाळेची वाट झाली बिकट:शाळा गाठण्यासाठी चिमुरड्यांना‌ करावी लागते चिखलातून पायपीट; रस्त्यावर खड्ड्यांमुळे साचले पाण्याचे डबके

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशाला,जिल्हा परिषद केंद्रीय  कन्या शाळा, अंगणवाडी,येडेश्वरी कन्या प्रशाला या शाळेंच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून,पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले आहे. सर्वत्र चिखल झाला आहे. या चिखलातून शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना व नागरिकांना मात्र कसरत करावी लागत आहे. तसेच शेतातील पाणी गावाच्या दिशेने याच रस्त्यावर येत असल्याने व या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी नाली व गटारी नसल्याने पावसाचे व शेतातून येणारे  दुर्गंधी युक्त व घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. 

शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक धडे शिकण्यासाठी आतुर आहेत, परंतु त्यांना चिखलाचा रस्ता आडवा येतोय. या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.या रस्त्याने शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागत आहे. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता गावात येण्यासाठी अधिक प्रमाणात वर्दळीचा असून चारचाकी दुचाकी वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना खूप कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. 

पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना त्याचप्रमाणे खास करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments