उमरगा तालुक्यातील मुरुम येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अकरावी प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ गुरुवार (ता. ४) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे संचालक तथा शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक इंगोले होते. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक रामराव इंगोले, तानाजी फुगटे, माजी प्राचार्य डी. टी. इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य जी. आर. इंगोले यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान शाखेतून प्रथम आलेला शिंदे प्रसाद तुकाराम, द्वितीय कु. जाधव शुभांगी दत्ता, कला शाखेतून प्रथम कु. कांबळे उज्या भगवान . द्वितीय कु. राठोड रोशनी राजकुमार, वाणिज्य शाखेतून प्रथम कु. पाटील पूजा शिरीष द्वितीय कु. इंगळे प्रियंका कृष्णा या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक विषयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विषय शिक्षकामार्फत पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.शेषेराव राठोड, प्रा.विजया बेलकेरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय इंगळे तर आभार प्रा. हुलगुंडे मॅडम यांनी मानले. यावेळी प्रा. के. बी. माने महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराप्रसंगी मान्यवरांसोबत विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य.
0 Comments