Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आदर्श शिक्षक वैजनाथ शंकरप्पा पंचगल्ले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

मुरुम/प्रतिनिधी
जीव्हाळा ग्रुपच्या क्रियाशील सदस्य  वैजनाथ शंकरप्पा पंचगल्ले  तथा पंचगल्ले कुटुंबाबरोबरच सर्वाचे आवडते अण्णा या टोपण नावाने प्रसिध्द असलेले अण्णा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

संभाजीराव केद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.लहाने व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या तर्फे शाल, पुष्पहार व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

वैजनाथराव (अण्णा) हे गेल्या पंधरा वर्षापासून जिव्हाळा ग्रुपचे एक क्रियाशील व सक्रिय सभासद असून त्यांनी विविध सार्वजनिक कामांमध्ये स्वतःला झोकून देवून जबाबदारीने काम पार पाडले आहे. त्यांनी शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी एक वेगळी  पध्दती अवलंबली होती. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार, फोटोग्राफर, फरडे वक्ते, नाटककार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख या परिसरात आहे. मुळचे अतनूर तालुका जळकोट येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण डी.एड तुळजापूर येथे पूर्ण झाले होते. बावीस वर्षांपूर्वी ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा वर्षापासून जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमात ते हिरीरीने सहभाग घेतात. प्लास्टिक निर्मुलन, दिवाळी मधे गरजु लोकाना फराळ व चादरी वाटप, रक्तदान अशा कर्यक्रमात ते आपले योगदान देत असतात.या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सतत कार्यतत्पर राहणे आणि गरजूंना मदत करणे हा सेवाभाव त्यांचा राहिल्यामुळेच या परिसरातील सर्व लोक त्यांना 'अण्णा ' या नावाने तर त्यांच्या पत्नी कमल यांना ' अक्का ' या नावाने ओळखले जाते.

त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त भारत मल्टीपरपज एज्युकेशन सोसायटी,नळगीरचे तथा जीव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, उपाध्यक्ष विश्वनाथ माळेवाडीकर, राष्ट्रपती पोरितोषिक मानकरी तथा संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे,  चंद्रकांत रोडगे, संस्था सचिव रमाकांत बनशेळकीकर, सचिव विवेक होळसंबरे, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिव्हाळा ग्रुपचे समन्वयक डॉ.अनिल भिकाणे, पांडुरंग बोडके आदींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन पुढील आयुष्य आरोग्यमय जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments