Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीसह परिसरात संततधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान; सोयाबीन पिवळे पडू लागले तर कांद्याची महागडी रोपे पाण्यात


काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील काटीसह परिसरात मागील दहा ते बारा दिवसांपासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. तर कांदा लागवडीसाठी लावलेली रोपे पाण्यात  गेल्याने तिही वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान झाले आहे.

काटीसह परिसरात मागील दहा ते बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र १० दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी  शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील अशी अशा शेतकरी बाळगून आहेत. 

संततधार पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेक
"परिसरात मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे.दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतर मशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, तुर, मुग,उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत."  
       --रावसाहेब देशमुख, शेतकरी काटी 
                                    ता. तुळजापूर 

संततधार पावसामुळे पिके पाण्यात
"संततधार पावसामुळे पिके पाण्यात असून परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना अनेक  ठिकाणी तलावाचे स्वरुप आल्याने मोठे नुकसान झाले आहे."
                           --राजु वाडकर
                   शेतकरी काटी ता.तुळजापूर


Post a Comment

0 Comments