Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य निर्मितीतून महापुरुषांचा इतिहास मांडला---किरण गायकवाड

मुरुम/प्रतिनिधी 
शिवराय, फुले, शाहू व आंबेडकर यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांची परिवर्तनवादी चळवळ अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य निर्मितीतून महापुरुषांचा इतिहास मांडल्याचे प्रतिपादन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केले. 

अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वी जयंतीनिमित्त गुरूवारी (ता. १) रोजी आयोजित शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील सभागृहात अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद कुलकर्णी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड, मराठा सेवा संघाचे संजय सावंत, श्रीधर इंगळे, माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, अजिंक्य मुरूमकर आदींची प्रमुख उपस्थित होती. 

पुढे बोलताना किरण गायकवाड म्हणाले की. अण्णाभाऊंनी नाटकातील गणवंदना बंद करुन प्रथम मायभुच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवना, असे म्हणत शिवरायांना अभिवादनाची वंदना सुरु केली. जग बदल घालुनी घाव सांगुन गेले मजं भिमराव, असे म्हणत मनुवादी विचारसरणीवर घणाघाती घाव घातला. अण्णाभाऊ साठे हे अवघे दिड दिवस शाळेत जावून विविध प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, शाहीरी, कविता, लोकनाट्य, नाटके, स्फुटलेखन असे साहित्य निर्माण केले. 

प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्रमोद कुलकर्णी यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक असल्याचे म्हटले. या कार्यक्रमासाठी बबनराव बनसोडे, शेषेराव सरवदे, विनायक देडे, राजेंद्र देडे, अमित देडे, तुळशीराम देडे, मल्लाप्पा देडे, किरण देडे, बालाजी बनसोडे, सुमित बनसोडे, ओमकार कांबळे, रोहित कांबळे आदींनी परिश्रम घेतले.                      

मुरूम, ता. उमरगा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना प्रमोद कुलकर्णी, किरण गायकवाड, बबनराव बनसोडे व अन्य

Post a Comment

0 Comments