Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील महर्षी रामजी शिंदे हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व कला साहित्य वाटप

तुळजापूर:- तुळजापूर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलमध्ये गुरुवार  दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाच्या  वतीने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व कला साहित्य वाटप करण्यात  आले.

प्रारंभी उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक व  साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आली.
           
यावेळी  विद्यालयातील  शिक्षकवृंदांच्या वतीने  विद्यार्थ्यांना शंभर ड्रेस व कला शिक्षक एस.डी. हुंडेकरी यांच्या वतीने चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन एल.एल. आदटराव यांनी केले. यावेळी प्राचार्य पवार, आगार प्रमुख शिंदे, मुख्याध्यापक यलगोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी तुळजाभवानी कॉलेजचे प्राचार्य जीवनकुमार पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. यलगोंडे,तुळजापूर एस.टी.आगार प्रमुख  शिंदे, वाहतूक नियंत्रण प्रमुख  व्यवहारे, वाहतूक निरीक्षक जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रसाद खामकर, सतिश घोगरे,रामकृष्ण मगर, संभाजी कापसे, गोविंद मुगूटराव, पर्यवेक्षक डॉ.मुरूमकर, श्रीमती मोकाशी एस.ए. तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह तुळजापूर परिसरातील पालक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

या  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुंभार ओ.डी.यांनी केले तर आभार क्षीरसागर के.टी.यांनी मानले.

Post a Comment

0 Comments