Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लातूरचे नवनियुक्त खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रेल्वे प्रवासी व दळणवळणाच्या दृष्टीने केल्या विविध मागण्या; रेल्वे मंत्री वैष्णव यांचे सकारात्मक आश्वासन

धाराशिव:- लातूरचे नवनियुक्त खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी दक्षिण मराठवाडा, लातूरकरांचे व रेल्वे प्रवाशांचे प्रश्ना संदर्भात गुरुवार दि.1 रोजी सायंकाळी 6 वाजता रेल्वे भवन दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध  मागण्या केल्या. 

मराठवाडा जनता विकास परिषद,दक्षिण मराठवाडा संघर्ष समिती व तालुका प्रतिनिधी शिवाजीराव नरहरे, समीर पडवळ, ॲड. शेखर हविले, पांडुरंग देडे,डॉ.भास्करराव बोरगावकर, डॉ.भास्करराव पाटील, डॉ.श्रीकांत गायकवाड,अनिल दरेकर,शिवाजीराव भिसे, प्रो.एस.एस.पाटील, ॲड.शिवहर उतके,सुपर्ण जगताप, नागोराव पाटील, श्रीकांत जोशी, अशोकराव मार्कडेय, देवदत्त तोडेवाले, जी. येस.जाधव, व्ही.जी.नरहरे,आर.व्ही.माने, बी.डी.पेठे, पाटील विठ्ठलराव भाऊसाहेब, बालाजी येरोळे, शि.वै.मदलापुरे, कुलकर्णी शै. म.,पडीले गो.भा. यांनी नुकतेच खासदार डॉ.काळगे यांना मागण्यांचे निवेदन दिले होते. 

त्याअनुषंगाने त्यांनी गुरुवारी रेल्वे मंत्री अश्विनी  वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्या केल्या यामध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे लातूर हैदराबाद अशी वंदे भारत रेल्वे सुरू करावी,तसेच लातूर शहरातील जुना रेल्वे स्थानक परिसरातील जमीन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोपविण्यात यावी, लातूर-औसा- गुलबर्गा ही नवीन रेल्वे लाईन करण्यात यावी, लातूररोड-अहमदपूर-लोहा-नांदेड हा नवीन रेल्वे लाईन तयार करावी,आणि लातूर रोड-जळकोट - बोधण हा रेल्वे मार्ग तातडीने पूर्ण करावा, सर्वच लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला लातूररोड- बार्शी ते कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग दुहेरी करावा, यासह गेल्या अनेक दिवसांपासून येथील रेल्वे कोच कारखान्याचे काम रखडले आहे. रोजगार निर्मितीचा उद्देश हा बाजूलाच राहिला असून या कोच फॅक्टरीतुन लवकरात लवकर रेल्वे डबे निघावेत,यासह विविध मागण्यांचे चार पत्रांचे निवेदन मा.खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले. 

या मागण्यांसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉ.काळगे यांना दिले.

Post a Comment

0 Comments