Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या लक्ष्मीचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा.....

मुरुम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) 
 येथील जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता सहावीत शिकत असलेली कारखाना साईट लगत असलेल्या विठ्ठल मंदिरा शेजारी राहणारी कुमारी लक्ष्मी सुनिल जगदाळे हिचा आई-वडिलांच्या पश्चात वाढदिवस शनिवारी (ता. १७) रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गतवर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये श्रावण महिन्यातील सोमवारी अचलबेट देवस्थानचे दर्शन करून निघालेले विठ्ठल मंदिराचे पुजारी जगदाळे कुटुंबीय एका रस्ता अपघातात उध्वस्त झाले. त्यामध्ये लहान निरागस कुमारी लक्ष्मीचे आई-वडील व इतर नातेवाईकांचा टमटम आणि ट्रकच्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच टमटममध्ये प्रवास करत असलेली या शाळेची  लक्ष्मी थोड्याशा दुखापतीने सहीसलामत बचावली आणि आज त्याच लक्ष्मीचा वाढदिवस प्रशालेत साजरा झाला. दैव बलवत्तर म्हणून वाचलेली ही लक्ष्मी (इ. ६ वी) व तीचा मोठा भाऊ दत्तात्रय (इ. ७ वी) जिल्हा परिषद प्रशाले शिकत आहेत. गेल्यावर्षी ही दुर्दैवी घटना घडल्यावर या प्रशालेची सर्व टीम विठ्ठल मंदिर माळ येथे भेटण्यासाठी गेली होती. माळकरी, धार्मिक वृत्तीचे जगदाळे कुटुंबीयांना सांत्वनपर दुःख व्यक्त करुन आधार दिला होता. त्याच दिवशी या टीमने लक्ष्मी व दत्तात्रय यांचे इयत्ता दहावी पर्यंतच्या शैक्षणिक साहित्य मदतीसाठी दत्तक घेतले. त्यानुसार आज लक्ष्मीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेतील उपक्रमशील शिक्षिका संगीता माने व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी  ड्रेस, शालेय साहित्य, फेटा व हार घालून, केक कापून लक्ष्मीचा वाढदिवस सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, हरिभाऊ माकणे, शिवाजी कवाळे, मोहन राठोड, प्रवीण ठाकूर, सुभाष व्हटकर, निर्मला परीट, राजू पवार, बाळासाहेब कांबळे, नागनाथ कामशेट्टी, अविनाश कवाळे आदींनी पुढाकार घेतला.           

मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत लक्ष्मीचा वाढदिवस साजरा करताना प्रशालेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी व अन्य.

Post a Comment

0 Comments