येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरूम कडून निघणाऱ्या मुरूममोड येथे गोमांस वाहतूक करणारे रिक्षा चालकासह गोमांस तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसाच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी दि.18 रोजी सकाळी 8 वाजता सुमारास उघडकीस आला. या प्रकरणांवरून मुरूम पोलिस ठाण्यात तिघांजनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरूम येथून रिक्षा (क्र.एम एच 25 बी.5708) गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळतास दत्ता हुळमजगे, प्रदीप गव्हाणे, वैभव लामजने आदी युवकांनी रिक्षाचा पाठलाग करीत मुरूममोड येथे राष्ट्रीय महामार्ग जवळ रिक्षा थांबवला. या रिक्षाची पाहणी केली असता त्यांना रिक्षात गोमांस असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती मुरुम पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गाडेकर, पो.हे.कॉ. संजीवन शिंदे, भिमराव समुद्रे, चालक अशोक राठोड यांनी प्रत्यक्ष घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
दत्ता हुळमजगे यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात असून रिक्षा चालकसह शाहिद, महंमद मसूलदार वय (40) वर्षे शास्त्रीनगर मुरूम, मेहबूब निजामुद्दीन कुरेशी वय (40) वर्षे चांदपाशा अब्दुलगणी कुरेशी वय (30) वर्षे दोघेजण मटण दुकानदार रा.कसाईगल्ली मुरूम यांच्यासह रिक्षा ताब्यात घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा रेड्डी, डॉ.श्रीकांत कदम यांच्यासह पंचनामा केला. यात 98 केलो गोमांस असल्याची खात्री झाली. व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला. उर्वरित गोमसावर सोपस्कार करण्यात आले.
0 Comments