Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अथर्व अमृतराव यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्याचे वाटप

प्रतिनिधी | तुळजापूर 
 वायफळ खर्चाला फाटा देत अथर्व कीरण अमृतराव चा वाढदिवस शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना मिष्ठान्न जेवण तसेच शालेय साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला. अमृतराव परीवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. 
    
अथर्व अमृतराव चा वाढदिवस शहरातील रामवरदायनी प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न जेवणाची सोय करण्यात आली होती. तर जेवणा नंतर युवा नेते कृष्णा रोचकरी, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांचा हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शालेय पोषण आहार वितरणासाठी आवश्यक ३५० स्टील च्या प्लेट शाळेला भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अमृतराव परीवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

 


Post a Comment

0 Comments