काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील रहिवासी शेतकरी पुत्र शुभम कालिदास जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेरीटच्या यादीत स्थान मिळवल्याने त्याची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याने तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी सारख्या छोट्याशा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, आपले उचित ध्येय निश्चित गाठता येते हे खुंटेवाडी येथील कालिदास सुखदेव जाधव या शेतकऱ्याचे पुत्र शुभम जाधव याने सिध्द करून दाखवले आहे.शुभमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर गगनभरारी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच 1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. हि परिक्षा शुभमने उत्तीर्ण होऊन गरुडझेप घेतली आहे. शुभमचे वडील हे कामानिमित्त पुण्यात फुरसुंगी पुणे येथे गेले होते. तेथे ते किराणा दुकान व्यवसाय सांभाळून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यानंतर 2015 सालापासून आपल्या खुंटेवाडी या आपल्या मुळ गावी येऊन शेती व्यवसाय सांभाळत आहेत.
शुभम जाधव याचे शालेय शिक्षण फुरसुंगी पुणे येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाले तर 11 वी 12 पर्यंतचे शिक्षण हडपसर पुणे येथील साधना महाविद्यालयात झाले व महाविद्यालयीन पदवी पर्यंतचे शिक्षण अण्णासाहेब मगर महाविद्यालय मांजरी पुणे येथून पुर्ण केले.
शुभमच्या आई पद्मिनी या गृहिणी आहेत. तर शुभमला अश्विनी विलास गायकवाड व कल्याणी आशितोष आवारे या दोन विवाहित बहिणी आहेत. शुभम जाधव याने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. यशाचा मार्ग खडतर असला तरी त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते.त्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली. त्यातच त्याने 2022 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. त्यानंतर ऑक्टोबर 2023,जुन 2024 व जुलै 2024 या टप्प्यातील अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शुभम जाधवने पुर्व परिक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व तोंडी मुलाखत असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील चारही टप्पे यशस्वीरित्या पार करीत या चारही टप्यात त्याने घवघवीत यश संपादन केल्याने व पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एक निष्ठावान पोलीस अधिकारी बनून व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शुभम जाधव याने सांगितले. तसेच या यशात वडील कालिदास जाधव,आई पद्मिनी व आजी राजाबाई सुखदेव जाधव व मार्गदर्शक शिक्षकांचा सिंहांचा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार
तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभम जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याबद्दल वडाळा येथे एका आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह (दादा) पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, वडाळ्याचे सरपंच जितेंद्र साठे, मा.जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, पत्रकार हरिभाऊ घाडगे, खुंटेवाडी येथील माजी उपसरपंच महादेव जाधव, विजय निंबाळकर, प्रशांत गाटे, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
खुंटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
शुभमच्या अभूतपूर्व यशाबद्दल व खुटेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोहल्याबद्दल खुंटेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि.4 रोजी शुभम जाधवची ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातून भव्य मिरवणूक काढून त्याचा जंगी सत्कार करण्यात आला.
अभिनंदनपर बॅनर झळकले.....
0 Comments