Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड


काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रहिवासी तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई येथील ऐरोली स्पोर्ट असोसिएशन कार्यालयात शनिवार दि. 17 रोजी सकाळी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र केदार, सरचिटणीस राजेश महाडिक, कार्याध्यक्ष कैलास गोरे यांच्या  हस्ते दत्तात्रय शिंदे यांना  जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देऊन अभिनंदन केले.

निवडीनंतर संघटनेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत यापुढे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व जनरल कामगार कार्यरत आहेत जे ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता कमी पगारात निरंतर कार्य करत  आहेत. अशा लोकांसाठी या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कामगार योजना पोहोचवायचे काम निश्चित स्वरूपात करणार असल्याची ग्वाही दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments