Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नामांकित कंपनीत रोजगाराची संधी; शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) योगेश केदार यांच्या मागणीला यश

धाराशिव येथे 29 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा; 50 हजार युवक- युवतींना रोजगाराची संधी; शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांच्या मागणीला यश
तुळजापूर:-धाराशिव येथे 29 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याच्या माध्यमातून 50 हजार युवक- युवतींना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाढती बेकारी, विकासापासून कोसो दूर असलेल्या,आकांक्षित  राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) योगेश केदार यांनी आपल्या जिल्ह्यातील  युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. 

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, मंगलप्रभात लोढा यांनी  सकारात्मकता दाखवून धाराशिव  येथे मेळावा घेण्यासाठी मान्यता दिली आहे. या कामात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी संतोष राऊत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

येत्या 29 ऑगस्ट रोजी धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात राज्यातील नामांकित कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली आहे. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून 50 हजार पेक्षा जास्त युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन हा मेळावा  यशस्वी करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच या मेळाव्यासाठी पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले.

या मेळाव्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक -युवतींना रोजगार मिळणार अशी ग्वाही देऊन या मेळाव्यात जिल्ह्यातील युवक-युवतींनी बहुसंख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे प्रवेश योगेश केदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments