Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

फार्मसी कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण; प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा

 
मुरूम/प्रतिनिधी
श्री माधवराव पाटील महाविद्यालय, फार्मसी कॉलेज व प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन गुरुवारी (ता. १५) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, राजू भोसगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिनियार, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे समन्वयक डॉ. रवि आळंगे, इंग्लिश स्कूलचे परिवेक्षक सच्छिदानंद अंबर, मुख्याध्यापिका अनुराधा जोशी आदींची उपस्थिती होती. फार्मसी कॉलेजच्या परिसरात शरण पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 प्रा. डॉ. रवि आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदनी लिमये, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. सुदीप ढंगे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा.अनिल मोरे, डॉ. पुरुषोत्तम बारवकर आदींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सहशिक्षिका संगीता देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सहशिक्षिका प्रभावती कलशेट्टी, नेहा माने व गीता सत्रे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी मनोगतातून भावना व्यक्त केल्या. सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, साधना शेवाळकर, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश सुरवसे तर सरस्वती समन यांनी आभार मानले.      

मुरूम, ता. उमरगा येथील फार्मसी कॉलेजच्या परिसरात शरण पाटील, व्यंकटराव जाधव, अशोक सपाटे, रवी आळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करताना प्राध्यापक व अन्य.

Post a Comment

0 Comments