Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी शाळेसमोरील प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनींनी विविध वेशभूषा केली होती. 

प्रभात फेरीनंतर शाळेचे मुख्याध्यापक अमिन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायनासह, भाषणे व समाजप्रबोधनात्मक घोषणा दिल्या.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक  अमिन शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक तानाजी शेळके यांनी तर आभार सहशिक्षिका विद्युल्लता आलाट यांनी मानले.

Post a Comment

0 Comments