Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

डॉ. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथपाल दिन साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला ग्रंथालयाचा लाभ

                 
मुरूम/प्रतिनिधी
 येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १२) रोजी ग्रंथालयाचे जनक पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय दिन म्हणून सबंध देशभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रारंभी ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना फार्मसी कॉलेजच्या विभाग प्रमुख प्रा. प्रियंका काजळे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे यांनी ग्रंथालयाचा पूर्व इतिहास विद्यार्थ्यांच्यासमोर मांडला. 

याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेतला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र आळंगे,  डॉ. सुजित मटकरी, डॉ. किरण राजपूत, डॉ. अविनाश मुळे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे, प्रा. दयानंद बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. सुदीप ढंगे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. अनिल मोरे, विजयालक्ष्मी भालेराव, मल्लू स्वामी, अशोक कलशेट्टी, प्रभाकर महिंद्रकर आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालताना प्रा. प्रियंका काजळे, डॉ. राजकुमार देवशेट्टे यांच्या हस्ते अभिवादन करताना प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य.       

ग्रंथालयात पुस्तकांची वाचनासाठी निवडक पुस्तके हाताळताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Post a Comment

0 Comments