Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालाजी स्पेशालिटी केमिकल लि. आणि बालाजी अमाईन्स लि. यांच्या वतीने विविध शाळांना शालोपयोगी साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लि.युनिट 1 फॅक्टरीमध्ये बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील विविध शाळांना सी.एस.आर. फंडा अंतर्गत शालोपयोगी साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे असणार आहेत. तर मैनक घोष (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव,बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी.राम रेड्डी, बालाजी स्पेशालिटी केमिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.एन.राजेश्वर रेड्डी व सी.एस.आर. विभाग प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार श्री.म.आ. बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमासाठी बालाजी  अमाईन्सचे सी.एस.आर. विभाग प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार श्री.म.आ.बिराजदार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments