मुरुम/प्रतिनिधी
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली) मुरुम शाखेच्या वतीने संत निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता. ११) रोजी वृक्ष लागवड व संवर्धन या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याकरिता लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे होते. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे डॉ. सुधीर पंचगल्ले, बालाजी व्हनाजे, रोटरीचे सचिव सुनिल राठोड, ग्रीन क्लब समन्वयक डॉ. विलास खडके, मुख्याध्यापिका मंदाकिनी कांबळे, सोनाली कलशेट्टी, हरीकिसन पवार, कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, सुरेश कोळी, सूर्यकांत दुधभाते, किशोर चव्हाण, युवराज बनसोडे, हणमंत पोतदार, दगडू दिक्षीवंत, राम राठोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छता सेवादल बिरु बंदीछोडे, दत्ता बोडरे, शिवा राठोड, शिवानंद बिराजदार, शुभम कोकणे, विष्णू पवार, विठ्ठल फुलगाले, समर्थ साखरे, सार्थक बोडरे तर सेवादल बहिणजी अनुसया नारायणकर, उषा साखरे, मंगल बनसोडे, गुरुदेवी बोडरे, श्रध्दा साखरे आदिंनी घनकचरा, गवत व झाडे-झुडपे तोडून परिसर स्वच्छ केला. मीरा मोटे, मुक्ताबाई कोळी, जयश्री सोनवणे, पुष्पा यादव, राधिका धनशेट्टी, अश्विनी बिराजदार, भारत बेगमपुरे, मंगल घोडके आदिंनी पुढाकार घेवून अभियान यशस्वी केले. याप्रसंगी प्रशालेतील गरजू विद्यार्थिनींना शालेय पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या अभियानाचे प्रास्ताविकपर मनोगत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. महेश मोटे तर आभार सुधाकर नारायणकर यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वृक्ष लागव
ड व लोखंडी जाळी बसविताना पुरुष व माता भगिनी.
0 Comments