मुरुम/प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा महोत्सव हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरात प्रभात फेरी भारत शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी (ता. १३) रोजी काढण्यात आली. याप्रसंगी ७५ मीटरचा तिरंगा घेऊन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी घोषणा देत प्रभात फेरी शहरातील मुख्य रोडवरून काढताना तरुण व नागरिकांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. गजानन उपासे, प्रा. किसन माने, प्रा. शेषेराव राठोड, प्रा. विजया बेलकेरी, प्रा. बालाजी इंगोले, प्रा. प्रकाश चव्हाण, प्रा. वर्षा हुलगुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सुजित चिकुंद्रे, प्रा. किशोर कांबळे, प्रा. श्रीकांत शिंदे, प्रा. विनय इंगळे, प्रा. रोहन हराळकर, प्रा. प्रसाद इंगोले, प्रा. राजेंद्र बुवा, अवधूत गुरव, सय्यद इम्रान, विलास चव्हाण, अनिकेत सगट आदींनी पुढाकार घेतला.
मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शहरात तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरी काढताना कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य.
0 Comments