Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून तामलवाडी येथे सीएसआर अंतर्गत शालेय साहित्याचा वितरण सोहळा दिमाखात संपन्न

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व सोलापूर येथील बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत सीएसआर अंतर्गत शालेय साहित्याचा वितरण सोहळा बुधवार दि. 14 रोजी तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लि. युनिट 1 मध्ये दिमाखात संपन्न झाला.

तामलवाडी व सोलापूरातील बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून धाराशिव जिल्ह्यातील 23 शाळांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

तामलवाडी येथील बालाजी अमाईन्सच्या युनिट मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, तहसीलदार अरविंद बोळंगे, बालाजी  अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी. राम रेड्डी सोलापूर सीएसआर विभाग  प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार म.आ. बिराजदार यांच्या हस्ते साहित्यांचे वितरण करण्यात आले. 

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून जिल्ह्यातील 5 शाळांना ११ स्मार्ट टीव्ही,  शाळांना  संगणक, 1 शाळांना प्रयोग शाळेचे साहित्य,3 शाळांना आर.ओ. मशिन्स, 12 शाळांना 290  डेस्कचे वाटप करण्यात आले.

बालाजी उद्योग समूहाचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान
         -------जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे 
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी  सचिन ओम्बासे यांनी बालाजी उद्योग समूहाकडून केल्या जाणाऱ्या समाजोपयोगी कामाचे कौतुक केले. बालाजी अमाईन्स कंपनी नेहमीच सामाजिक कार्यात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात या कंपनीचे मोठे योगदान  राहिले असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन बालाजी अमाईन्सने मोठे सहकार्य केले आहे. या कंपनीचा विकास कामांमध्ये सिंहांचा वाटा असल्याचे  सांगून बालाजी परिवाराने उद्योग क्षेत्रातील स्पर्धेत टिकून प्रगती केली आहे. शिवाय धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रात केलेली मदत खुप कौतुकास्पद आहे. गरजवंतासाठी आवश्यक ती मदत पुरवणे हे मोठे सामाजिक काम आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी समाज म्हणून कंपनीला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कंपनीच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या आणि सर्व शाळांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या साहित्यांचा योग्य प्रकारे वापर करण्याचे आवाहन केले.

यापुढेही बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून सामाजिक कामासाठी मदत करणार
                 ---संचालक डी. राम रेड्डी
यावेळी नागरिकांना संबोधित करताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले की, खेड्यातील शाळांना विविध सुविधांची वनवा आहे.त्यांना चांगल्या सुविधा पुरवल्यास मुलांचे चांगले भविष्य घडू शकते . शहरी भागाप्रमाणे गावातील मुलांनाही सुविधा मिळाव्यात या हेतूने विविध शाळांना मागणीप्रमाणे चांगले साहित्य बालाजी अमाईन्स पुरवते .विद्यार्थ्यांच्या भावना व त्याचा होत असलेला फायदा पाहून समाधान वाटते .सर्वांना दीर्घकाल उपयोगी ठरेल व त्याची योग्य काळजी घेत त्या साहित्याचा प्रभावी वापर करावा असे आवाहन करीत यापुढेही बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

तामलवाडी ग्रामस्थांच्या वतीने रेड्डी यांचा सत्कार करताना माजी सरपंच दत्तात्रय वडणे, पंचायत  समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे, त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवन्नप्पा मसुते, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच सुधीर पाटील, डॉ. रविकांत गुरव आदी मान्यवर......

बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय  संचालक डी. राम रेड्डी यांना "जीवन गौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार 
या कार्यक्रमात तामलवाडी ग्रामस्थ,तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघ,सुरतगाव, पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.

तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करताना तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, माजी अध्यक्ष उमाजी गायकवाड 

या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांनी केले.

सुत्रसंचलन करताना सहशिक्षक विठ्ठल नरवडे

यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, तहसीलदार अरविंद बोळंगे, बालाजी  अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी. राम रेड्डी, सोलापूर सी.एस.आर. विभाग प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार म.आ. बिराजदार, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, पंचायत  समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे, त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवन्नप्पा मसुते, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच सुधीर पाटील, डॉ. रविकांत गुरव, प्रसाद सांजेकर,विनोद  चुंगे, आर एस शास्त्री,मारुती सावंत,दुर्गम साहेब, दत्तप्रसाद सांजेकर ,सचिन मोरे ,बसवराज अंटद,अमोल गुंड,महेंद्र कावरे, सुरतगावचे उपसरपंच बाबासाहेब गुंड, पांगरदरवाडीचे उपसरपंच सोमनाथ शिंदे, इर्शाद शेख, संभाजी माळी, महादेव मसुते,पत्रकार अविनाश गायकवाड, संतोष  मगर, सर्जेराव गायकवाड, उमाजी गायकवाड आदी 
मान्यवरांसह शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय साहित्य वितरण दरम्यान उपस्थित मान्यवर ......

Post a Comment

0 Comments