Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारी नगरचा राजा गणेशोत्सवातील" होम मिनिस्टर" कार्यक्रमात 250 महिलांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग; अश्विनी गोरे,नंदिनी कोळगे व मरियम मुल्ला ठरल्या‎ पैठणीच्या मानकरी‎

तुळजापूर/उमाजी  गायकवाड
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड कडील पुजारी नगर मध्ये श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश विश्वनाथ पुजारी, महेश पुजारी व‌ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून "पुजारी  नगरचा राजा" या नावाने यंदा प्रथमच सामाजिक  भान ठेवून व  अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूक  विरहित व होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा घेत गणेशोत्सवास सुरुवात  करण्यात आली.

प्रारंभी कॉलनीतील जेष्ठ नागरिक विश्वनाथ पुजारी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन करुन "होम मिनिस्टर खेळ  पैठणीचा" या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

"पुजारी नगरचा राजा " गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा कॉलनीतील महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देत महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा, "होम मिनिस्टर‎" खेळ पैठणीचा कार्यक्रमाला कॉलनीतील महिलांनी‎ चांगलीच पसंती दिली. या कार्यक्रमात 250 महिलांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद  लुटला.

अतिशय रंगतदार झालेल्या या‎ स्पर्धेत नंदिनी  विकास कोळगे या पैठणीच्या‎ मानकरी ठरल्या तर प्रतिक्षा कुंभार यांना द्वितीय क्रमांकासाठी मिक्सर व पुनम राठोड यांनी तृतीय क्रमांकासाठी हॉट किटलीचे पारितोषिक पटकावले. कुंभार व‎ राठोड या अनुक्रमे द्वितीय‎ व तृतीय स्थानी राहिल्या.‎ रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या अश्विनी गोरे तर द्वितीय क्रमांक मिक्सर प्रतिक्षा कुंभार तर तृतीय क्रमांकाचे हॉट किटलीचे पारितोषिक पुनम राठोड यांना मिळाले. रांगोळी स्पर्धेत लहान गटातून प्रथम समृध्दी कदरे, द्वितीय  क्रमांक शांकबरी कपील आवताडे तर तृतीय क्रमांक स्वाती कुंभार यांना अनुक्रमे मिक्सर, टीपीन डबा व हॉट किटली गिफ्ट देण्यात आला.

जेष्ठ नागरिक विश्वनाथ पुजारी, गणेश पुजारी, महेश पुजारी, मंडळाचे  अध्यक्ष विशाल शिंदे, सोमनाथ  पुजारी,तानाजी  म्हेत्रे आदींसह कॉलनीतील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संगीत खुर्ची, गाणी, तोंडाने फुगा फुगवून  एकमेकांचे फुगे फोडणे अशा स्पर्धात्मक विविध खेळांच्या फेऱ्यांमध्ये‎ मिळालेल्या गुणांनुसार अश्विनी  गोरे या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या‎. तर लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या विजेत्या मध्ये प्रथम पारितोषिक ओव्हन हे प्राजक्ता विक्रम बनकर यांना मिळाले तर द्वितीय क्रमांकासाठी पैठणी मरियम मुल्ला यांना मिळाली.

तब्बल‎ साडेतीन तास चाललेली ही स्पर्धा‎ अतिशय रंगतदार झाली. यासाठी‎ गणेश  पुजारी, पत्रकार  अनिल आगलावे, महेश पुजारी, सोमनाथ पुजारी, तानाजी  म्हेत्रे यांनी अतिशय कल्पकतेने या सर्व‎ स्पर्धांचे नियोजन केले होते. या स्पर्धेसाठी पुण्यातील स्वेता झंवर यांनी आपल्या सुंदर ॲंकरिंगने सर्वांना साडेतीन तास खेळवून ठेवले होते.तर या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सहशिक्षक तानाजी म्हेत्रे यांनी केले होते.

अनावश्यक खर्चाला फाटा देऊन दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणार
---आधारस्तंभ गणेश पुजारी
यंदा प्रथमच गणेशोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला एकत्रित आल्याने व त्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान वाटले. यापुढे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यार असल्याचे मंडळाच्या वतीने मंडळाचे आधारस्तंभ गणेश पुजारी यांनी सांगितले.

उद्योजक दिनेश अग्रवाल यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप
सामाजिक कार्यकर्ते दिनेश अग्रवाल यांच्या वतीने शुक्रवारी गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सौ. शुभांगी पुजारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण 
स्पर्धेतील विजेत्यांना सौ. शुभांगी गणेश पुजारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक सहभागी महिलांनाही एक छत्री भेट देण्यात आली.
मंडप सौजन्य...
या गणेशोत्सवात संपूर्ण स्टेज डेकोरेशन, स्पीकर , माईक सिस्टीम, मंडप सजावटीसाठी काशिनाथ (राजाभाऊ) राऊत यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी नगरचे संस्थापक गणेश पुजारी,महेश पुजारी, विशाल शिंदे, देविदास पुजारी, प्रतीक मोरे,सागर धनके,बाबुराव पुजारी, सोमनाथ पुजारी, धनंजय शिंदे,दिपक चौगुले, विनायक बेरगळ,सिध्दराज कोळेकर,नागनाथ पुजारी,कृष्णा पुजारी,आदिनाथ पुजारी, प्रेम पुजारी,कालिदास पुजारी,सौरभ राऊत,शुभम राऊत, तनिष्क जाधव , सयाजी राहुल जाधव आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी मंडळातील सदस्यासह कॉलनीतील  महिला मोठ्या संख्येने‎ उपस्थिती होत्या.‎

Post a Comment

0 Comments