मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील बलराम गणेश मंडळाची स्थापना २००१ मध्ये होऊन त्याला २४ वर्ष पूर्ण झाले. या मंडाळाच्या पदाधिकाऱ्यांनी काटकसर करुन श्री गणेश व महादेव मंदिर उभा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या भूमिपूजनासाठी श्री. मृगेंद्र महास्वामी करीबसवेश्वर मठ, गुरु गंगाधर महास्वामी, श्री गुरु सिद्धेश्वर विश्वत मठ, जेवळी, उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, येणेगूरचे सरपंच रेखाताई गुंजोटे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन बाबासाहेब बिराजदार, शेखर स्वामी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूजा करुन गणरायाची आरती व भूमिपूजन करण्यात आले.
आरतीनंतर मंगल मूर्ती मोरया ! गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा देण्यात आल्या. बलराम गणेश मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, टोपी घालून सत्कार करण्यात आला. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायतचे सदस्य विजयानंद सोनकटाळे, सदस्य दिलीप येडगे, सदस्या ज्योतीताई मुदकण्णा, लक्ष्मीबाई पाटील, संदीप बिराजदार, राहुल बनसोडे, संतोष कलशेट्टी, प्रविण कागे, सौरभ उटगे, निजगुण स्वामी, सोमशंकर पाटील, बलराम गणेश मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ थाटे, दिपक हलमडगे, साई बिराजदार, दयानंद संगशेट्टी, अमोल स्वामी, देवराज बिराजदार, संगप्पा बादुले, महेश मायनाळे, सिद्धेश्वर हलमडगे, मदार भालके, शिराज मुन्शी, ओम संगशेट्टी, वैभव हिप्परगे, अनिल संगशेट्टी, अनिल मचाले, अलताफ तांबोळी, पप्पू स्वामी, सचिन स्वामी, वैजिनाथ बिराजदार, विठ्ठल पांचाळ, आदम येळीकर सह गावातील बहुसंख्येने भक्तगण व नागरिक उपस्थिती होते.
0 Comments