Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर शहरातील "पुजारी नगरचा राजा" गणेशोत्सवाची आरती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी बंधूंच्या हस्ते संपन्न; गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन; रविवारी होणार महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर शहरातील नव्याने निर्माण झालेली नळदुर्ग रोडवरील सोसायटीतील  "पुजारी नगरचा राजा " या मंडळाच्या नावाने श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून  यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत  आहे. 

मंगळवार दि.10 रोजी सायंकाळी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी बंधूंच्या हस्ते  गणरायाची मोठ्या भक्तीमय वातावरणात "गणपती  बाप्पा मोरया" च्या जयघोषात आरती करण्यात आली. यावेळी "पुजारी नगरचा राजा " गणेशोत्सव मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात खर्च होतो या मिरवणुकीवर होणारा अनावश्यक  खर्च टाळून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय पुजारी नगर मधील सर्व सदस्यांच्या  बैठकीत घेण्यात आला आहे. पुजारी नगर सोसायटीच्या गणेशोत्सवाचे पहिलं वर्ष असल्याने मंडळाचे आधारस्तंभ गणेश पुजारी व सर्व सन्मानिय पदाधिकारी यांच्या विचारातून " मिरवणूक विरहीत गणेशोत्सव " कायमस्वरूपी साजरा केला जाईल असा निर्णय झाला. 

मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आबा रोचकरी व निलेश भैय्या रोचकरी बंधूंचा सत्कार करण्यात आला.

पुजारी नगरचा राजा गणेशोत्सवानिमित्त यंदा  प्रथमच 
महिलांना त्यांच्या दैनंदिन जीनवक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा व गौरी गणपतीच्या भक्ती सेवेतून त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी, महिलांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्या कला -कौशल्याचे सादरीकरण व्हावे, गौरी गणपती उत्सवात महिलांचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी शनिवार  दि. 14 रोजी रांगोळी स्पर्धा आणि रविवार दि.15 सप्टेंबर रोजी महिलांचा आवडता कार्यक्रम "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" व रांगोळी  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन पुण्यातील प्रसिद्ध ॲंकर श्वेता झंवर या करणार आहे. तर सोमवार दि.16 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंडळाच्या वतीने शनिवार  दि. 14 रोजी रांगोळी स्पर्धा व रविवार दि.15 रोजी होणाऱ्या "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमासाठी महिलांनी नाव नोंदणी करुन  जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व या कार्यक्रमाचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन "पुजारी नगरचा राजा" गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments