Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नारीशक्ती हस्ते पुजारी नगरच्या राजाची महाआरती

तुळजापूर:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये पुजारी नगर सोसायटीमध्ये यंदा प्रथमच विराजमान झालेल्या पुजारी नगरच्या राजाची महाआरती नारीशक्तीच्या हस्ते करण्यात आली.

सोसायटीच्या 101 महिलांना मानाचे फेटे बांधून महाआरती करण्यात आली. पुजारी नगर सोसायटीतर्फे यंदाच्या पहिल्याच गणपती उत्सवात एकसंघ कुटुंबाप्रमाणे रहिवासी नागरिकांना एकमेकांशी संवाद करता यावा,ओळख वाढावी यासाठी या सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याचा संकल्प मंडळाच्या तरुण पदाधिकारी यांनी केला होता.

सोसायटीच्या सर्व शेकडो महिलांसाठी यंदा होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. शुभांगी गणेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम ही आयोजित करण्यात आली होती यात सहभागी होत भरघोस बक्षिसे मिळवली.

यंदा प्रथमच साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक भान ठेवून व अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूक विरहित गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments