ढोकी/सुरेश कदम
धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले तेरणा धरण मागील तीन दिवस पासुन तुडुंब भरून खळखळुन वाहत असल्याने पर्यटकास परिसरातील हौसे गौसे धरणातील वाहते पाणी पाहून सेल्फी काढुन आनंद लुटत होते.
पाण्याचा वाढता प्रवाह पाहून ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिखोटे यांनी सोमवार दि.2 पासुन तीन होमगार्ड तेरणा धरणावर कार्यरत ठेवले आहेत. तेरखेडा ,वाशी तसेच तेरणा धरण परिसरात पाऊसाने जोरदार झोडपल्याने तेरणा नदीसह छोट्या मोठ्या नद्यांना पुर आला असून तेरणा धरण ओव्हर फ्लो होऊन खळखळ वाहत असल्याने ढोकी ते तेर रोडलगत धरण असल्याने येथून जाणारे प्रवाशी व पर्यटक धरण पाहण्यासाठी मागील तीन दिवसांपासून प्रचंड गर्दी करत होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तेरणा धरणावर जाण्यास बंदी घातली असून या ठिकाणी तीन होमगार्ड तैनात केले असून होमगार्ड सकाळी 8 ते सायकाळ 7 पर्यंत तेरणा धरणावर ठाण माडुन बसले आहेत.
सेल्फी काढताना पर्यटकासह ग्रामस्थाच्या तोल जाऊन कोणत्याही क्षणी जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पर्यटकाच्या व ग्रामस्थाच्या सुरक्षाची काळजी घेत पोलिस प्रशासनाने तेरणावर धरण पाहण्यासाठी बंदी घातली आहे असून तीन होमगार्ड येथे पहारा करीत आहेत.
नागरिकांनी तेरणा धरणावर सेल्फीचा मोह टाळावा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे
सध्या तेरणा धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस पडल्याने नदी नाले फुलहाऊस वाहत आहेत तसेच तेरणा धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी तेरणा धरणावर जाऊन सेल्फीचा मोह टाळावा सेल्फी फोटो घेवू नये आपल्या जिवाची काळजी घेण्यासाठी ढोकी पोलिस स्टेशनकडुन तीन होमगार्ड ठेवण्यात आले आहेत या होमगार्ड सहकार्य करावे असे आवाहन ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष तिखोटे यांनी केले आहे.
0 Comments