ढोकी/प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथामिक केंद्रीय शाळा व्यवस्थापन समितीच्या सन 2024 ते 2026 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदासाठी मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी सदस्याची बैठक मंगळवार दि.3 रोजी आयोजित केली होती.
यामध्ये अध्यक्षपदासाठी अतुल लोहार व बालाजी लंगडे हे दोन इच्छुक उमेदवार असल्यामुळे दोघात चिठ्ठीद्वारे गुप्त मतदान घेण्यात आले यामध्ये अतुल लोहार यांना 8 तर बालाजी लंगडे यांना 3 मते पडली त्यामुळे अतुल लोहार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी शशीकांत भुतेकर यांची सर्वानमते बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव मुख्याध्यापक राजेंद्र माने तर सदस्य आनिता लंगडे,रुतुजा तांबे,रेखा भोळे,दिप्ती कांबळे,सोनाली लोहार, विद्यार्थी प्रतिनिधी तनिष्का सोनार,शिल्पा कोष्टी,शिक्षक प्रतिनिधी अनुराधा जगदाळे,दौलत गाढवे,विश्वराज सुतार,ज्ञानेश्वर केंचे,एजाज पठाण यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
नुतन व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिका-याचे मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले यावेळी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.
0 Comments