Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त सैनिक संजय पवार यांचा नागरी सत्कार

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील अंबरनगर येथील सैनिक संजय गोपा पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी परत येत असताना मुरुम ग्रामस्थांतर्फे त्यांचे भव्य स्वागत मंगळवारी (ता. ३) रोजी शहरात आगमन होताच फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.  शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी व सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पवार यांची बालपणीच मातृछाया हरवल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांचे वडील गोपा पवार यांच्यावर पडली.

वडिलांनी तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा गाडा सुस्थितीत ठेवला. अशा परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करीत पवार २००७ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचे सैनिकी प्रशिक्षण पुणे येथे झाले. त्यांची पहिली पोस्टिंग दोड्डा (जम्मू-काश्मीर)  त्यानंतर जम्मू काश्मीर भागातील पूछ सीबीएस येथे तर उदयपूर (राजस्थान) व शेवटी जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथून सेवा केल्यानंतर अखेर हवालदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. 

यावेळी माजी प्राचार्य दत्ता इंगळे, सामजिक कार्यकर्ते किरण गायकवाड, पत्रकार मोहन जाधव, माजी सैनिक राजेंद्र बेंडकाळे, अंबरनगर सरपंच किसन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील माजी सैनिक संघटना, मराठा सेवा संघ, युवासेना व नागरिकांनी पवार यांचा सत्कार केला. यावेळी मराठा सेवा संघाचे संजय सावंत, श्रीधर इंगळे, माजी सैनिक संघटनेचे व्यंकट चौधरी, अंबर नगरचे उपसरपंच शिवाजी जाधव, गणेशनगरचे सरपंच संजय चव्हाण, पोलीस पाटील रोहीदास चव्हाण, कोतवाल सतीश जाधव, रोहीदास पवार, तानाजी राठोड, गुलाब राठोड, राजू पवार, संदिप राठोड, रणजीत राठोड, गणेश जाधव, माजी सैनिक राजू राठोड, राजू जाधव, दासु राठोड आदींनी पुढाकार घेतला. अंबरनगर येथे संजय पवार पोहचले असता बंजारा समाज भगिनींनी बोलीभाषेतील गौरव गीते गाऊन स्वागत केले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. 

यावेळी सत्काराला उत्तरदेताना संजय पवार म्हणाले की, देश सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मुरुम शहरातील व अंबरनगर ग्रामस्थांनी माझा सत्कार केला. आपले प्रेम पाहून माझ्या देशभक्तीचे कार्य सार्थकी लागल्याचे मला समाधान वाटले. समाजातील युवकांनी देश व राष्ट्रीय एकात्मतेसाठी वाहून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.     

मुरुम, ता. उमरगा येथे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त सैनिक संजय पवार यांच्या नागरी सत्काराप्रसंगी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

Post a Comment

0 Comments