Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक एस. आर.बोंदर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास सोलंकर व शिक्षणप्रेमी सदस्य सुनिल गायकवाड यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी मनोगते व्यक्त केली.

शालेय विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना...

यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास सोलंकर म्हणाले की, शिक्षक आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला केवळ शिक्षणच देत नाहीत तर आपले चारित्र्य, मूल्ये आणि आदर्श निर्माण करतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास उर्फ बिरु सोलंकर आपले मनोगत व्यक्त करताना....

तसेच शिक्षणप्रेमी सदस्य सुनिल गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की, शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सद्गुणांचा घडवून आणतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षकांविषयी आदर राखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिक्षणप्रेमी सदस्य सुनिल गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना....

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक बोदर एस.आर.,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास सोलंकर, शिक्षणप्रेमी सदस्य सुनिल गायकवाड सहशिक्षक शेळके टी.बी.,जंगले आय.डी., कटकधोंड बी.बी., पवार एस.एस.,कोळी आर.डी.,आलाट व्हि.ए.,माने एस.बी.,जोशी जी.व्हि.,गुंड एम.बी.,माळी के.डी.आदी मान्यवरांसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करताना...



Post a Comment

0 Comments