काटी/उमाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे, सोलापूर विभागाच्या संचालकपदी तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशिल द्राक्ष बागायतदार हणमंत भानुदास गवळी यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे, कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सावरगावचे माजी उपसरपंच रामेश्वर (आबा)तोडकरी, भाजपचे यशवंत (अण्णा) लोंढे, शहाजी लोंढे, तामलवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय (मामा)वडणे व मित्रपरिवारांच्या हस्ते गुरुवार दि. 5 रोजी वडगाव (काटी) येथील त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, संजय लिंगफोडे, पंढरी डोके, धर्मराज शिंदे, परमेश्वर तानवडे आदीजण.....
बुधवार दि. 4 रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन प्रगतशील द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी यांना सन्मानित करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी यांना वडिलोपार्जित 5 एकर शेतजमिन होती. त्यांनी 2001 साली आपल्या शेतात द्राक्ष बाग लावण्यास सुरुवात केली.त्यांनी स्व: च्या कष्टावर 85 एकर शेत जमीन खरेदी करुन त्या क्षेत्रात सध्या 70 एकरात द्राक्ष बाग फुलवली आहे. या त्यांच्या यशामध्ये त्यांचे बंधू श्रीमंत भानुदास गवळी यांचाही सिंहांचा वाटा आहे. दरवर्षी त्यांच्या 70 एकरावरील संपूर्ण निर्यातक्षेम द्राक्ष युरोप खंडात निर्यात होत आहेत. दोन भावांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. त्यांचा एक मुलगा अर्जुन हणमंत गवळी बीएससी ॲग्री, मुलगी वैभवी हणमंत गवळी बीई कॉंप्युटर तर एक मुलगा समर्थ हणमंत गवळी व बंधु श्रीमंत गवळी यांची कन्या स्वेता गवळी ही प्रवरा नगर अहमदनगर येथे वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत.
वडगाव (काटी) येथील द्राक्ष बागायतदार श्री हणमंत गवळी हे स्वत:च्या शेतामधील 70 एकरावरील द्राक्ष पिकांवर विविध प्रयोग करुन अल्प पाण्यामध्ये तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे सातत्याने ते प्रयत्न करीत असतात. हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे श्वोत्र वाढविण्यासाठी 4 हेक्टरवर 4 शेततळी केली असून 50 बोअर व 7 विहिरी पाडल्या आहेत. त्यांच्या एवढ्या कामाच्या व्यापातूनही वडगाव (काटी), सावरगाव भागातील इतरही शेतकऱ्यांना ते द्राक्ष पिकांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीत असून अल्प जमीन असवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन केल्यामुळे या भागातील बहुतांष शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून संघाच्या पुणे,नाशिक, सोलापूर व सांगली विभागांपैकी द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी यांची सोलापूर विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सत्कार समारंभास भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, भाजपचे यशवंत अण्णा लोंढे, शहाजी लोंढे, तामलवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय वडणे,माजी सरपंच शंकर शिंदे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र कदम, अविनाश शिंदे, यशवंत कुलकर्णी, संजय लिंगफोडे, पंढरी डोके, धर्मराज शिंदे, परमेश्वर तानवडे, रमेश लिंगफोडे, श्रीमंत गवळी, गोविंद गवळी,नानासाहेब कदम यांच्या परिसरातील द्राक्ष बागायतदार व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments