तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलमध्ये गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त "शिक्षक दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेत थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त स्कूल डे कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. एकदा शिकविणे म्हणजे दोनदा शिकणे या वाक्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थांना ज्ञानदानाचे काम करीत विषय शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रत्यक्ष वर्ग अध्यापन केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची नियुक्ती शाळेतील विविध पदांवर करण्यात आली होती. त्यामध्ये कु.गार्गी महेंद्र कावरे हिने मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळविला.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक यलगोंडे आर.बी. पर्यवेक्षक डॉ.संजय मुरूमकर व एक दिवशीय शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेली कु.गार्गी महेंद्र कावरे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर इयत्ता दहावीतल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक ते सहा या वेळेत इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले. प्रत्यक्ष अध्यापन करताना विद्यार्थी शिक्षक म्हणून आलेल्या अनुभवांचे कथन स्कुल डे मधील विद्यार्थी-शिक्षकांनी केले.
कुटूंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी धावपळ करणाऱ्या पालकांकडून अपेक्षित संस्कारांची पूर्तता शिक्षक-पालक या नात्याने शिक्षकच पुर्ण करीत असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक यलगोंडे आर.बी. यांनी केले. त्यानंतर सर्व विद्यालयातील शिक्षकांचे गुणगौरव करण्यात आला.
त्यानंतर शिक्षकांमध्ये श्री क्षीरसागर के.टी, श्री घोरपडे ए. आर.,श्री. कुंभार ओ.डी यांनी आजच्या दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व दिवसभर चाललेल्या या ज्ञान यज्ञ सोहळ्यात विशेष मार्गदर्शन केले.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या "स्कूल डे"कार्यक्रमाचे नियोजन सहशिक्षक क्षीरसागर पी.बी,घोडके के.डी.घोरपडे यांनी केले. अध्यक्ष भाषण विद्यालयाचे मुख्याध्यापक यलगोंदे आर.बी.यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा घाडगे व सृष्टी जाधव या विद्यार्थिनी केले.
यावेळी विद्यालयातील श्री. आदटराव एल.एल., हुडेकर एस.डी.,सौ.मोकाशी एस.ए. मॅडम अंकुशराव मॅडम,सौ. तांदळे मॅडम,श्रीम.गुरव मॅडम, सौ.मोकाशी के.ए.मॅडम, कु.कदम मॅडम, कु.सोलापूरे मॅडम,तसेच पवार एन.जे., सेवक श्री नेताजी शिंदे,विशाल जाधव आदींसह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 Comments