Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरोग्य संवर्धनाकरिता सकारात्मक जीवन जगणे आवश्यक---डॉ. अनिकेत इनामदार नेशन बिल्डर अवार्डने शिक्षकांचा सन्मान

               
मुरूम/प्रतिनिधी
आरोग्य संवर्धन म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्याचे आणि टिकवण्याचे उपाय. आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी, पुरेशी झोप, नियमित वैद्यकीय तपासणी, सामाजिक आणि भावनिक आरोग्य, कुटुंबासोबत वेळ घालवणे, मित्रांशी संवाद साधणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य संवर्धन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी साधे राहून नेहमी सकारात्मक जीवन जगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उमरगाचे मधुमेह तज्ञ डॉ. अनिकेत इनामदार यांनी केले. रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवार्ड ने शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. ५) रोजी माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सन्मान करण्यात आला. युवानेते शरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळातील शिक्षकांची भूमिका व जीवनशैली या विषयावर उमरगाचे मधुमेह तज्ञ डॉ. अनिकेत इनामदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ. अनिकेत इनामदार, रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, डॉ. सतिश शेळके, डॉ. रविंद्र आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्ण व चैतन्यमूर्ती माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी मुरूम शहरातील विविध शाळेतील सहशिक्षिका शैलजा माने, रेणुका कुलकर्णी, सहशिक्षक संतोष कडगंचे, हरी शेके, मनोज बोंदर, शिवानंद बोलदे, मुख्याध्यापक पिरप्पा अष्टगी, नूरअहमद कानकुर्ती, राधाकृष्ण कोंढारे, प्रा. विजया बेलकेरी, प्रा.अण्णाराव कांबळे, प्रा. डॉ. महेश मोटे आदींचा मानपत्र, शाल, पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका गायकवाड यांचा रोटरीत प्रवेश केल्याबद्दल रोटरीची पिन लावून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय अस्वले यांनी नेशन अवार्डचा हेतू व भूमिका विशद केली. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक सपाटे यांनी केला. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. सुवर्णा पाटील, मल्लिकार्जुन बदोले, राजकुमार वाकडे, प्रा. भूषण पाताळे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर मोटे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनिल राठोड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात  रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवार्डने शिक्षकांना सन्मानित करताना मान्यवर व सत्कारमूर्ती.


Post a Comment

0 Comments