मुरुम /प्रतिनिधी
मुरुम रोटरी क्लबच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ज्ञानदानाच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सर्व शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देवून सन्मान करण्यात येतो. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार रोजी शिक्षक दिनानिमित्त प्रा.विजया बेलकेरी यांना मुरुम रोटरी तर्फे त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा बिल्डर नेशन अॅवार्ड हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब तर्फे या नेशन बिल्डर अवॉर्ड सोहळ्यास शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य व रोटे. संजय अस्वले व ऊमरगा येथील ख्यातनाम डाॅ. अनिकेत ईनामदार याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक सपाटे तसेच डाॅ. सतीश शेळके ,रोटरीचे अध्यक्षा कमलाकर मोटे, रोटरीचे सचिव सुनिल राठोड ,प्रतिभा निकेतन विद्यालयाचे उपप्राचार्य तथा रोटे. उल्हास घुरघुरे यांच्या प्रमूख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विविध विषयांत पारंगत व शैक्षणिक कार्यापलीकडे जात गावाला अभिमान वाटावा, असे कार्य करत सर्वोच्च योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यात शिक्षक, शिक्षिका, यांचा समावेश आहे. यावेळी रोटरीचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक, नागरिक व महिला उपस्थित होत्या. सोहळ्यात उत्साहाचे वातावरण होते.
हा पुस्कार मिळाल्याबद्धल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल भैय्या मोरे व अश्र्लेष भैय्या मोरे यांनी अभिनंदन केले. तसेच कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद इंगोले व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर सहकाऱ्याकडुन अभिनंदन करण्यात आले.
0 Comments