Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

" पुजारी नगरचा राजा " गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना; युवा नेते विनोद (पिंटू) भैय्या गंगणे यांच्या हस्ते आरती; पहिल्याच वर्षी रंगणार "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा"

तुळजापूर:-तुळजापूर शहरातील नव्याने निर्माण झालेली नळदुर्ग रोडवरील सोसायटी " पुजारी नगर " यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. पुजारी नगर सोसायटी अंतर्गत आजमितीला जवळपास 130 अधिक रो हाऊस आणि वैयक्तिक बंगलो निवासी कुटुंब राहतात. 

पुजारी नगर सोसायटीच्या गणेशोत्सवाचे पहिलं वर्ष असल्याने आधारस्तंभ श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व सर्व सन्मानिय पदाधिकारी यांच्या विचारातून " मिरवणूक विरहीत गणेशोत्सव " कायमस्वरूपी साजरा केला जाईल. असा निर्णय झाला. सोसायटीच्या सर्व शेकडो महिलांसाठी यंदा " होम मिनिस्टर खेळ पैठणीचा " उपक्रम आयोजित केला आहे. आणि विविध सांस्कृतिक उपक्रम ही आयोजित आहेत.

" पुजारी नगरचा राजा " प्रथमवर्ष सार्वजनिक गणेशोत्सवात पहिल्या दिवसाच्या आरतीचा मान तुळजाई नगरीतील युवा नेते आदरणीय " विनोद (पिटु) गंगणे " यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments