Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर शहरातील " पुजारी नगरचा राजा " गणेशोत्सवाची आरती तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते तर सायंकाळची आरती मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते संपन्न; मंडळाच्या मिरवणूक मुक्त निर्णयाचे कौतुक

तुळजापूर:- तुळजापूर शहरातील नव्याने निर्माण झालेली नळदुर्ग रोडवरील सोसायटीतील  "पुजारी नगरचा राजा " या मंडळाच्या नावाने श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी यांच्या संकल्पनेतून  यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत  आहे. पुजारी नगर मधील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. पुजारी नगर सोसायटीच्या गणेशोत्सवाचे पहिलं वर्ष असल्याने मंडळाचे आधारस्तंभ गणेश पुजारी व सर्व सन्मानिय पदाधिकारी यांच्या विचारातून " मिरवणूक विरहीत गणेशोत्सव " कायमस्वरूपी साजरा केला जाईल. असा निर्णय झाला. 

रविवार दि. 8 रोजी सकाळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शिवश्री सज्जनराव (भाऊ) साळुंके यांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात आरती करण्यात आली. रविवार दि. 8 रोजी सायंकाळची गणेशोत्सवाची आरती मंडळाचे अध्यक्ष विशाल शिंदे पती-पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.

यंदा गणेश चतुर्थी दिवशी विविध ठिकाणी व घराघरातून गल्ली गल्लीतून आपली परंपरा जपत गणेशमूर्तीची उत्साहात स्थापना करण्यात आली. परंतु "पुजारी नगरच्या राजा"गणपतीची नंदीवर विराजमान असलेली गणेश मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेश मूर्ती व करण्यात  आलेला सभा मंडप पाहून मन प्रसन्न होत आहे. मंडळाने घेतलेल्या मिरवणूक मुक्त गणेशोत्सवाचे सज्जनराव साळुंके यांनी कौतुक केले असून गणेशोत्सव कार्यक्रमात आवाजाचे प्रदुषण न करता मंडळाने दर्जेदार व  समाजप्रबोधनपर उपक्रम राबवावेत असा सल्ला देत सामाजिक उपक्रमांसाठी मंडळास काहीही मदत लागली तर ती मदत देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मंडळाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.

पुजारी नगरचा राजा गणेशोत्सवानिमित्त यंदा  प्रथमच सोसायटीच्या सर्व शेकडो महिलांसाठी यंदा " होम मिनिस्टर खेळ पैठणीचा " उपक्रम आयोजित केला आहे. तसेच  रांगोळी स्पर्धेसह विविध सांस्कृतिक उपक्रमाचेही आयोजन  करण्यात आले आहे. गणेश पुजारी यांच्या आवाहनाला मंडळातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मंडळाच्या वतीने शनिवार  दि. 14 रोजी रांगोळी स्पर्धा तर रविवार दि.15 रोजी होणाऱ्या "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमासाठी महिलांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

"पुजारी नगरचा राजा " प्रथमवर्ष सार्वजनिक गणेशोत्सवात शनिवार  दि. 7 रोजी सायंकाळी पहिल्या दिवसाच्या आरतीचा मान तुळजाई नगरीतील युवा नेते " विनोद (पिटु) भैय्या गंगणे " यांच्या हस्ते करण्यात आली. 

युवा नेते विनोद (पिंटू) भैय्या गंगणे मंडळाच्या आरती दरम्यान मंडळातील सदस्य 

"पुजारी नगरचा राजा " गणेशोत्सव मंडळाच्या आरतीवेळी  मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

मंडळाची नंदीवर विराजमान असलेली आकर्षक मूर्ती 

Post a Comment

0 Comments